🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांनी घेतली मा.मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची भेट.....!


🌟यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा भरत घनदाट यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला🌟

परभणी (दि.१२ ऑगस्ट २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत घनदाट यांनी आज मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सहकार क्षेत्राचे जाणते व्यक्तिमत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर यांची सहृदय भेट घेतली.

या प्रसंगी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जेष्ठ नेते माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा भरत घनदाट यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवरांना जेष्ठ नेते माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पूर्णा तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे,पालम नगर पंचायतीचे नगरसेवक इमदाद खा पठाण,नगरसेवक शेख,ब्रह्मानंद भोसले आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या