🌟मुंबईतील बदलापुर घटनेचा परभणी येथील वकीलांनी केला निषेध.....!


🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन केली मागणी🌟 

परभणी : मुंबईतील बदलापूर येथील घटनेचा तपास जलदगतीने पूर्ण करुन न्यायालयात संबंधित आरोपीविरुध्द तातडीने आरोपपत्र सादर करावे अशी मागणी परभणी येथील वकीलांनी गुरुवार दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

              अ‍ॅड.संजय केकान, अ‍ॅड.काशिनाथ सातपुते, अ‍ॅड. व्ही.पी. कातकडे, अ‍ॅड. एस.के. राऊत, अ‍ॅड. डी.एस. साळवे, अ‍ॅड. एम.ए. कदम यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सखी सावित्री समित्या गठीत कराव्यात, मुला, मुलींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावनी करावी, अशी मागणी केली. बदलापूर प्रकरणात आरोपीविरुध्द कठोर कारवाई करावी, तरच असे अनुचित प्रकार घडणार नाहीत, कायद्याचा धाक निर्माण होईल, असेही या शिष्टमंडळाने निवेदनातून म्हटले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या