🌟परभणी जिल्ह्यात महायुतीतून शिवसेनेस दोन जागा सुटाव्यात ; स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींसमोर सूर....!


🌟असा सूर शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेतेमंडळींनी खासदार रविंद्र वायकर यांच्यासमोर व्यक्त केला🌟

परभणी (दि.21 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीत या जिल्ह्यातील चार पैकी जागा महायुतीतून शिवसेनेच्या पदरात पडाव्यात या दृष्टीने पक्षश्रेष्टठींनी प्रयत्न करावेत, असा सूर शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेतेमंडळींनी खासदार रविंद्र वायकर यांच्यासमोर व्यक्त केला.

             शिवसेनेचे नेते तथा खासदार वायकर हे बुधवार दि.21 ऑगस्ट रोजी परभणी व गंगाखेड या दोन मतदारसंघाच्या दौर्‍या निमित्ताने देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून सकाळी परभणीत दाखल झाले. त्यावेळी त्यांचे रेल्वेस्थानकावर स्थानिक पदाधिकार्‍यांनी जोरदार स्वागत केले. खासदार वायकर यांनी बुधवारी दिवसभरात भास्करराव लंगोटे व राजू कापसे यांच्या निवासस्थानी तर जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या खंडोबा बाजारातील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच माजी महानगरप्रमुख प्रविण देशमुख यांच्या निमंत्रणाप्रमाणे वसमत रस्त्यावरील श्री चिंतामणी मंदिरात दर्शन घेतले. देशमुख व समर्थकांद्वारे सत्कार स्विकारला. माणिकराव पोंढे यांच्या कार्यक्रमास हजेरी लावून माजी खासदार सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

               वायकर यांनी सावली या शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर सायंकाळी संवाद साधला. त्यावेळी स्थानिक पदाधिकार्‍यांनी या जिल्ह्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेवर विशेषतः धनुष्यबाणावर नितांत प्रेम केले आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत या जिल्ह्यातील किमान दोन मतदारसंघ शिवसेनेच्या हिश्यास यावेत या दृष्टीने प्रयत्नांची गरज आहे. श्रेष्ठींनी त्यासाठी दखल घ्यावी, असा सूर व्यक्त केला दरम्यान, यावेळी महानगरप्रमुख नितेश देशमुख, गीता सुर्यवंशी, माजी नगरसेवक शेख शब्बीर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या