🌟प्राचार्य डॉ राजकुमार यांनी उपस्थित शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात आदर्श आचरण व्यावसायिक नैतिकता जोपासाण्याबद्दल माहिती दिली🌟
पूर्णा (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केले आहे. सदरील धोरनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी सखोल माहिती सर्व शिक्षकांना व्हावी या उद्देशाने येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच नूतन शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात रुजू झालेल्या शिक्षकांसाठी गुरुदक्ष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. गुरुदक्ष कार्यक्रमात प्राचार्य डॉ राजकुमार यांनी उपस्थित शिक्षक यांना शैक्षणिक क्षेत्रात आदर्श आचरण आणि व्यावसायिक नैतिकता कशी जोपासायची याबद्दल माहिती दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे व्यासपीठावर उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अमलबजावणी समितीचे समन्वयक प्रा. डॉ. संजय दळवी यांनी सदरील कार्यशाळेत संसाधन व्यक्ति म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील 'कौशल्य शिक्षण’, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) तसेच नवीन शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण आराखडा याची अद्ययावत आणि सविस्तर माहिती उपस्थित शिक्षकांना दिली. कार्यशाळेच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यशाळा घेण्यामागील उद्देश याबद्दल माहिती दिली. डॉ. ओंकार चिंचोले यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. प्रकाश भांगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ. संतोष चांडोळे, डॉ. डॉ. राजू शेख, डॉ. विजय पवार आदींनी परिश्रम घेतले. श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमराव कदम यांनी कार्यशाळा घेतल्याबद्दल संयोजन समितीचे अभिनंदन केले......
0 टिप्पण्या