🌟आ.संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचकनगर येलकी येथे संत दुधाधारी महाराज यांच्या मंदिरात नगरभोजन संपन्न....!


🌟आ.बांगर यांच्या हस्ते 10 लाख रुपये निधीतून संत दुधाधारी महाराज मंदिर सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन पडले पार🌟

🌟आ.संतोष बांगर साहेब यांनी भजनीमंडळा सोबत खेळली पावली🌟

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचकनगर येलकी येथे संत दुधाधारी महाराज यांच्या मंदिरात नगरभोजन मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले.


  तसेच दिलेला शब्द पाळत आज मंचक नगर येलकी येथे आ.संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते 10 लाख रुपये निधीतून साकारणाऱ्या संत दुधाधारी महाराज मंदिर सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन देखील मोठ्या थाटात संपन्न झाले.

        यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी भजनी मंडळा सोबत गळ्यात टाळ घेत पावली देखील खेळली यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व परिसरातील भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या