🌟मंगरुळपीर तालुक्यातील 'त्या' ग्रामसेवकावर प्रशासनाची कारवाई ; तिन वेतनवाढ तिन वर्षाकरीता रोखल्या.....!


🌟न्याय न मिळाल्या सरपंचही आत्मदहन करणार : सरपंच मायाताई अमोल धोंगडे. यांचा प्रशासनाला इशारा🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायतच्या अपहार आणी मनमानीपणाविरूध्द खुद्द पं.स.सदस्यांनी तक्रार करुन न्याय न मिळाल्यास स्वातंञ्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने सदर ग्रामसचिवाच्या तिन वेतनवाढ तिन वर्षासाठी तात्पुरत्या रोखल्याची कारवाई केली.पण इतरही बाबीसाठी प्रशासनाने न्याय दिला नसल्याने सरपंचानेही तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे.


           निवेदनात नमुद आहे की,ग्रामपंचायत पेडगाव येथील १५ वा वित्त आयोगा अंतर्गत पं.स. स्तर निधी मधील कामाचे देयके सचिव ग्रामपंचायत पेडगाव श्री हरणे यांचे कडुन अदा न करणे व कार्यालयीन कामकाज न करणे बाबत. दि. ७/८/२०२४ सुनावणी नुसार म्हणने सादर करणे साठी अर्ज दाखल केला होता.त्या विषयानुसार पं.स. स्तरावरून मंजुर झालेली १५ वा वित्त आयोगाची कामे ही पुर्ण झालेली असुन सदर कामाचे मुल्यांकन मोजमाप पुस्तीका कामाचे पुर्णत्वाचे दाखले, कामाचा करारनामा व ठराव झालेले असतांना तसेच कामाचे बिल सुध्दा पं.स. स्तरावरून माहे फेब्रुवारी मध्येच ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. परंतु संबधीत कामाचे देयके अदा करण्यास ग्रामसेवक श्री हरणे हेतुपुरस्पर राजकीय दबावा खाली टाळाटाळ करीत आहे. कामा संबधी सर्व कागदपत्रे गोळा करून सांभाळणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. परंतु ते ग्रामपंचायतीचे कोणतेही कामे नियमानुसार करीत नाही. याबाबत यापुर्वीच तक्रार देवुन चौकशीची मागणी केलेली आहे. त्याची देखील चौकशी करण्यात यावी.त्याबाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.६/८/२०२४ ला सुनावणी घेवुन त्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे १५ व्या वित्त आयोगा कामाचे बिला संबधी दुकानदाराकडुन वारंवार मागणी होत असल्याने त्यांनी त्यांची बिले देणे आवश्यक असल्याने आपल्यास्तरावरून संबधीत झालेल्या कामाचे देयके दोन दिवसात त्यांची पुर्ण होणे बाबत ग्रामसेवक श्री हरणे यांना आदेशीत करावे असे निवेदन पेडगाव येथील सरपंच यांनी दिले होते.निवेदनात नमुद होते की,मी एक आदिवासी समाजाची महिला सरपंच असल्याने संबधीत ग्रामसेवक मला जाणीव पुर्वक अडचणीत आणत आहेत. त्यामुळे १५ व्या वित्त आयोगाच्या बिलाची अदायगी दोन दिवसात संबधीत ग्रामसेवकानी न केल्यास मला ना ईलाजाने १५ ऑगस्ट २०२४ स्वतंत्रदिनी जिल्हाधिकारी, कार्यालय वाशिम समोर आत्मदहन करावे लागेल व त्यांची संपुर्ण जबाबादारी आपली राहील असा इशाराही दिला होता.

* 'त्या' ग्रामसेवकाच्या तिन वेतनवाढी रोखण्याचे आदेश :-

श्री. आर. बी. हरणे ग्राम सेवक ग्रा.प. पेडगाव यांना संदर्भीय पत्रानुसार वारंवार सुचना / आदेश | देवूनही त्यांनी त्यांचे कर्तव्यामध्ये सुधारणा केलेली नसून विहीत वेळेत कामे पुर्ण न केल्याने कर्तव्यात व कसुर केले असल्याचे दिसुन येते. तसेच वरील सर्व बाबी नुसार व प्राप्त खुलाश्याचे अवलोकन केले असता खुलासा अमाधानकारक वाटत असल्याचे दिसुन आले आहे.त्याअर्थी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम यांनी संदर्भ क्र. १ अन्वये गटविकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन  गट विकास अधिकारी पंचायत समिती, मंगरुळपीर यांनी आदेशाद्वारे श्री.आर.बी.हरणे ग्राम सेवक ग्रा.पं.पेडगाव पं. स. मंगरुळपीर यांनी वरील प्रमाणे कर्तव्यात कसुर केला असल्याने त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधिल नियम ३ चा भंग केला असल्याचे सिध्द होत असल्याने श्री.आर.बी.हरणे ग्राम सेवक ग्रा.पं. पेडगाव पं.स.मंगरुळपीर यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे कलम ४(दोन) नुसार तिन वेतन वाढी तात्पुरत्या स्वरुपात तिन वर्षा करिता थांबविण्यात येत आहे.असल्याचा आदेश पारीत केला आहे.सदर आदेशाची नोंद श्री. आर. बी. हरणे ग्राम सेवक ग्रा.पं. पेडगाव पं.स. मंगरुळपीर यांचे मुळ सेवा पुस्तकात घेण्यात यावी असेही आदेशात नमुद आहे.

* एकीकडे लाडक्या बहीणीला विविध योजना तर दुसरीकडे आदिवासी सरपंच महिलेला आली आत्मदहनाची वेळ :-

देशाची राष्टपती या आदीवासी समाजाच्या आहेत पण तसेच महिलांच्या ऊन्नतीसाठी शासनही विविध योजना राबवत आहे.मुख्यमंञ्यांनी तर लाडक्या बहीणीसाठी मदत करण्यासाठी अप्रतिम योजना काढली असे असले तरी पेडगाव येथील आदीवासी समाजाची महिला सरपंच न्यायासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहे.न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा सरपंच यांनी दिल्याने वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या