🌟निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; ७८६५ मतदारांची भर....!

 


🌟दि.२० ऑगस्टपर्यंत दावे हरकती घेण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन🌟

परभणी :- निवडणूक आयोगाकडून काल मंगळवार दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यात एकूण ७८६५ मतदारांची भर पडली असून त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ४२ नवीन मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाकडून मंजुरी भेटलेली असल्याने १६२३ मतदान केंद्र आज रोजी अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या मतदारांमध्ये ७८६५ मतदारांची भर पडलेली असून आज रोजी जिल्ह्याची एकूण मतदार संख्या १५ लाख ४ हजार १६१ झालेली आहे. या मतदार याद्या जिल्ह्यातील एकूण १६२३ मतदान केंद्रावर आज रोजी प्रसिद्ध केल्या असून, सर्वांना त्या पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे   जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रावर मतदारांची नावे बरोबर असल्याबाबत खात्री करण्यासाठी बी एल ए नेमण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सर्व जनतेने आपापल्या मतदान केंद्रावर आपली नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याच्या सूचना केल्या. तसेच मतदार यादी बाबत काही आक्षेप असल्यास दिनांक २० ऑगस्टपर्यंत दावे हरकती मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अथवा बीएलओकडे सादर करण्याबाबत कळविले त्याचप्रमाणे आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये चालू असून सदर ठिकाणी सर्व राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी भेट देऊन ईव्हीएम मशीनसंबंधी काही शंका असल्यास त्यांचे निरसन करून ईव्हीएमची कार्यप्रणाली समजून घेण्याचे आवाहन केले...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या