🌟परभणी येथील आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांच्याकडून स्वाती घोडके यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान....!


🌟उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानसन्मान व प्रशस्तीपत्र देऊन स्वाती घोडके यांना सन्मानीत करण्यात आले🌟 


परभणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग यांच्यामार्फत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण आणि उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे,तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे यांनी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, स्वाती घोडके यांचा विस्तार कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानसन्मान व प्रशस्तीपत्र स्वाती घोडके यांना देण्यात आले.

 विस्तार कामांमध्ये शेती शाळा पीक प्रादेशिक जिल्ह्यांतर्गत अभ्यास दौरा राज्यांतर्गत अभ्यास दौरा किसान गोष्टी आत्मा अंतर्गत गट स्थापन करून महिलांना गृह उद्योग व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख गट प्रशिक्षण जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण तसेच कृषी मिळावे या ठिकाणी उत्कृष्ट स्टॉल उभारणी अतिशय उत्कृष्ट काम आत्तापर्यंत केले आहे, त्यांना एक प्रोत्साहन म्हणून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून प्रशस्तीपत्र देण्यात आले, स्वाती घोडके यांचा आतापर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कुलगुरू  डॉ. इंद्र मणी, सुनील चव्हाण सचिव मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन,  जिल्हाधिकारी परभणी रघुनाथ गावडे, माझी संचालक आत्मा कृषी आयुक्तालय पुणे दशरथ तांभाळे, डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ.उदय खोडके संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. खिजर बेग संचालक संशोधन,डॉ. देवराव देसरकर संचालक बीज उत्पादन,माजी जिल्हाधिकारी परभणी, आचल गोयल ,अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, साहेबराव दिवेकर  विभागीय कृषी सहसंचालक लातूर, डॉ. तुकाराम मोटे विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, डॉ.धर्मराज गोखले संचालक विस्तार शिक्षण, डॉ. प्रशांत देशमुख मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, अनिल गवळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, माझी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विजय लोखंडे तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील पशु शक्तीचा योग्य वापर या विभागातील डॉ. स्मिता सोळंकी यांनी देखील उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रशस्तीपत्र मानसन्मान  केला आहे, भाजीपाला उत्पादक ग्रुप  परभणी यांच्याकडूनही  पंडित थोरात, जनार्धन आवरगंड,रामेश्वर साबळे,प्रकाश हरकळ, यांच्याकडूनही प्रशस्तीपत्र व मानसन्मान उत्कृष्ट कामाबद्दल स्वाती घोडके यांचा या सर्वांच्या हस्ते झालेला आहे, तसेच स्वातंत्र्य दिनाच औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण आणि उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे मंडळ कृषी अधिकारी दैठणा कैलास गायकवाड,यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या