🌟पुर्णा शहरातील पंचशील नगरात १२ वे लोककवी वामनदादा कर्डक शाहिरी संमेलन संपन्न.....!


🌟लोककवी वामनदादा कर्डक शाहिरी संमेलनाचे आयोजन पंचशील नाट्य ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते🌟


 
पुर्णा :- पुर्णा येथील पंचशील नाट्य ग्रुप आयोजित लोककवी वामनदादा कर्डक शाहिरी संमेलन शहरातील पंचशील नगर येथे संपन्न झाले यावेळी संमेलनाचे उदघाटन पुज्य भंते संघरत्न यांच्या हस्तें संपन्न झाले यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले शाहिर विजय सातोरे यांनी वामनदादा कर्डक यांच्या कार्य कर्तव्य व आम्ही कलावंत या विषयावर मार्गदर्शन केले.


या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुनिती रविंद्र तेलगोटे,के.सी.आवटे,सुकेशनी वामन भुजबळ,पंचशीला हरीहर नरवाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी पंचशील नाट्य ग्रुपच्या सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार कालवश वामन भुजबळ यांच्या पत्नी सुकेशनी वामन भुजबळ व पंचशील नाट्य ग्रुपचे उपाध्यक्ष का प्रा नितिन नरवाडे यांच्या आई पंचशीला हरिहर नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.


उत्कृष्ट लेझीम सादरीकरण २०२३ स्नेहल खाडे,उत्कृष्ट प्रशिक्षक स्वाती मुदिराज,श्वेता दुधमल व उत्कृष्ट नियोजन वैशाली ऐगंडे,रुपाताई मुदिराज,ताई दुधमल यांचा सत्कार करण्यात आला. आई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रमा गायकवाड व पंचशील नाट्य ग्रुपच्या उपाध्यक्षा शकुंतला बनसोडे "घोलप"यांच्या तर्फे सर्वांना खिरदान करण्यात आले.

*विद्रोही कवी संमेलन* 

अध्यक्ष कवी मा उमेश बाऱ्हाटे, औरंगाबादचे कवी गोविंद जोंधळे,बालकवी कुऱ्हे,मीष्टी भिमा वाव्हळे, स्वाती मुदिराज, शाहिर गौतम कांबळे,विजय गायकवाड,किरण गायकवाड, रत्नदिप ऐगंडे, अंजली भालेराव, भुषण भुजबळ भिमा वाव्हळे आपण दाखवलेली दिशा अगदीच दिशादर्शक ठरेल,मनस्वी आभार.

*स्वरांजली*

अध्यक्ष ऍड हिरानंद गायकवाड, ऍड स्वप्नील जमदाडे, संदिप वेडे अंजली भालेराव, अविनाश जोंधळे,किशन कदम स्वाती मुदिराज, श्वेता दुधमल, समीक्षा गायकवाड,आशीष सुर्यवंशी,निलावती कदम आपण वामनदादाना समर्पित  केलेल्या रचना अवर्णनीय.

*शाहिरी जलसा*

अध्यक्ष शाहिर विजय सातोरे,शाहिर गणपत रणवीर,शाहिर प्रकाश जोंधळे, शाहिर राहुल भगत, मुक्ताबाई पंडित,विजय गायकवाड,किशन कदम,आनंद भगत आपण सादर केलेला शाहिर जलसा वामनदादा कर्डक यांच्या चळवळीच स्मरण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्ध धम्म संघ मानवतावादी विचाराची आठवण करून देत होते यावेळी त्यांचे आयोजकांकडून मनपुर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी काव्य मैफिल,सुरांच्या आनंदात सर्व नाहून गेले. सर्वांचं सादरीकरण - गायन, वादन आणि बोलणे - स्तुत्य होतं, ह्रदयातून आलेलं होतं आपल्या वक्त्यांनी दिलेली माहिती ही अनुभवातून आली असल्यानी भावून गेली कार्यक्रम संपल्यावर देखील उपस्थित मान्यवर मंडळींना घरी जावसं न वाटणं,पावलं आणि मन तिथेच रेंगाळत रहाणं, अजून थोडं हवं असं वाटणं ही तर कार्यक्रम यशस्वी झाल्याची पावती होती सदरील कार्यक्रम अत्यंत मंत्रमुग्ध करणारा असल्याने आयोजक सर्वांचे आभार मानले विसरले त्यामुळे प्रसार माध्यमांतून उपस्थित मान्यवर श्रोत्यांचे मनापासून आभार मानले पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार विजय गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भिमा वाव्हळे यांच स्वागत नियोजनासह बोध्दाचार्य त्र्यंबक कांबळे,हिरानंद गायकवाड,भुषण भुजबळ,राहुल अवतरमले,धारबा धुमाळे,विजय गवळी आशीष व पंचशील नाट्य ग्रुपच्या सर्व सावित्रीच्या लेकीच नियोजनातील सुसुत्रता खुपच प्रशंसनीय होती.

कार्यक्रमा नंतर सर्व आमंत्रित कवी,गायक,वादक कलावंत यांना राजश्री विजय गायकवाड वैशाली ऐगंडे यांच्या वतीने सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंडू गायकवाड यांची नियोजनबध्दता यावेळी सर्वांचेच मन मोहून गेली.....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या