🌟या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांची उपस्थिती🌟
परभणी/पुर्णा (दि.२२ ऑगस्ट २०२४) :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा व पालम अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने शनिवार दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पुर्णा-धनगर टाकळी रोडवरील गजानन मंगल कार्यालयात आपल्या मागण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे हे मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याला शासकीय अधिकारी सुद्धा उपस्थीत राहणार असून समितीच्या प्रमुख मागण्या बंधाऱ्यात स्थानिक 30 गावांच्या लोकांना पिण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी 70 टक्के पाणी राखीव ठेवणे....बंधाऱ्यात गेलेल्या शेत जमिनीचे भूसंपादन करून बाजार भावाच्या पाचपट दराने शेतकऱ्यांना मोबदला देणे....भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देणे....वाढीव पाणीपट्टी दर कमी करणे.....ज्या शेकऱ्यांना पाणी परवाने पाहिजेत त्यांना पाणी परवाने देणे इत्यादी मागण्या साठी पालम व पूर्णा तालुक्यातील ३० गावांच्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीचे अध्यक्ष बळीराम कदम यांनी केले आहे.......
0 टिप्पण्या