🌟परभणीत आमदार डॉ राहूल पाटील आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिरातील ४२ रुग्णांची होणार मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया...!


🌟मोतिबिंदु तपासणी शिबीरात चारशेहून अधीक रुग्णांना करण्यात आले मोफत चश्म्यांचे वाटप🌟 

परभणी (दि.०५ ऑगस्ट २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या मोतिबिंदु तपासणी शिबीरातून हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४२ रुग्णांवर मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

             शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या महिला जिल्हा संघटक अ‍ॅड.नहिद यांच्या प्रयत्नातून येथील गवसिया कॉलनीत मोफत मोतिबिंदु तपासणी शिबीर आणि चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर हे उपस्थित होते. या शिबीरातून हजारो रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यातून ४२ रुग्णांवर मोतिबिंदुची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ४०० च्या वर गरजू रुग्णांना चष्मेसुध्दा वितरित करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा प्रमुख करामत पठाण, प्रभाग प्रमुख इरफान खान, रहमान भाई, कासीम पिंजारी, शहर प्रमुख मोहम्मद अब्दुला राज आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या