🌟काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मिन्हाज खादरी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले🌟
पुर्णा (दि.१० ऑगस्ट २०२४) :- पुर्णा तालुका काँग्रेस पक्षात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले शेख रफिक यांचे कार्य पाहून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मिन्हाज खादरी यांनी त्यांची पुर्णा तालुका अल्पसंख्याक काँग्रेस कमेटीच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
पुर्णा येथील काँग्रेस कार्यालयामध्ये शेख रफिक यांना अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी परभणी जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी,अब्बाज खान पठाण,नवाब पठाण (मुंबई) रशीद मामू आदी मान्यवर उपस्थित होते......
0 टिप्पण्या