🌟यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी 'देणं समाजाचं परिवाराच्या' या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले🌟
पुर्णा (दि.१६ ऑगस्ट २०२४) :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधुन येथील निसर्गसौंदर्य वृक्षप्रेमी 'देणं समाजाचं परिवाराच्या' वतीने गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी येथील पुर्णा पोलिस स्थानकाच्या मोकळ्या आवारात भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते उत्तमराव कदम,उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरिक्षक डि.व्ही.नरसिंहाराव,सहाय्यक उपनिरीक्षक के.रंगाराव, इंगोले संतोष, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक जावळे,प्रधान आरक्षक रेल्वे सुरक्षा बल साहेबराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी 'देणं समाजाचं परिवाराच्या' वतीने शहरात वृक्षारोपनाची चळवळ अतिशय उत्कृष्ट पने राबवली असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी ही घ्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली वृक्षारोपणाची हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ आरोग्यतज्ञ डॉ.सोनी साहेब श्री भाले,श्री.प्रतिष्ठीत व्यापारी जब्बार शेठ थारा,सेवानिवृत्त अभियंता श्री आंबटकर,प्रतिष्ठीत व्यापारी तथा धार्मिक/सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर राहणारे आदर्श व्यक्तिमत्व सुभाषचंद्र ओझा,सोपानराव भुसारे,मारोतराव भुसारे,माधवराव भुसारे,भगवानराव भुसारे,डॉ.रमेश अकमार,मा.नगरसेवक दादाराव पंडित,श्री.पाम्पटवार सर,विलास हैंडगे,काशिनाथ कऱ्हाळे,प्रतिष्ठीत सराफा व्यापारी तथा पत्रकार अतुल शहाणे,नवनाथ पारवे,दशरथ, बालासाहेब जाधव,जेष्ठ पत्रकार सतीश टाकळकर,प्रतिष्ठीत व्यापारी प्रभाकर कोतावार,डॉ.गुलाब इंगोले,विद्या प्रसारणी शाळेच्या स्काऊटच्या विद्यार्थिनी आणि सर्व सन्माननीय पोलीस कर्मचारी वृंद आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट भव्य वृक्षारोपण करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला......
0 टिप्पण्या