🌟दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्यांची फेर मेडिकल तपासणी करून खोठ्या दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करा....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे मागणी🌟

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच उमेदवार शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत अलिकडेच पूजा खेडकर यांनी युपीएससीची फसवणूक करून आयएएस पद मिळविले होते या प्रकरणाची युपीएससी ने दखल त्यांच्यावर कार्यवाही केली आहे. 


दिव्यांगाचे बोगस प्रमणापत्रा मुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे, याकरिता जात पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग पडताळणी समिती स्थापन करणे आवश्यक असून यासाठी आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनास बैठका घेऊन सूचना देखील केल्या आहेत पण आता गांभीर्याने याकडे लक्ष देऊन याबाबत निर्देश देऊन कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

दिव्यांगाना न्याय देण्यासाठी दि.१९ जुलै २०२४ ते ०३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत प्रहार जनशक्ती पक्षाने "बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान" राबविले होते. या अभियानातून सोबत जोडलेल्या यादीतील शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या उमेदवारांची नावे निदर्शनास आली सदर संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणे आवश्यक आहे सदर यादीतील उमेदवारांची दिव्यांगत्व व प्रमाणपत्र पूर्णतपासणी करून त्याची पडताळणी करण्यात यावी व बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार याची नियुक्ती करण्यात यावी. ज्यांनी प्रमाणपत्र काढून दिले आहेत त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.

राज्यातील दिव्यांगाना न्याय देण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संबंधित प्रशासकीय विभागास सूचना देऊन दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी व १५ दिवसात यादीत जी संशयित उमेदवकारांची नावे हिले आहे त्यांची फेर मेडिकल व दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निवेदनाद्वारे केली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या