🌟कोलकत्ता मेडिकल कॉलेजातील विद्यार्थीनी वरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात २४ तास वैद्यकीय सेवा राहणार बंद....!


🌟परभणी जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनने घटनेच्या निषेधार्थ केले चोवीस तास वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन🌟

परभणी (दि.१८ ऑगस्ट २०२४) :- पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार (बलात्कार) करीत नराधमांनी तिची निर्दयीपणे हत्या केली या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या शनिवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी ०६.०० ते रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत तब्बल २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थानिक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजगोपाल कालानी व सचिव डॉ.सागर मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये दि.०९ ऑगस्ट २०२४ रोजी एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ  निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.

या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (सिबीआय) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशने १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन केले आहे. या दरम्यान अत्यावश्यक व आपात्कालीन  सेवा  आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील......

इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे केला आहे दरम्यान 24 तासाच्या या आंदोलनाची राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी सामान्य नागरिकांनी सुद्धा यांना या आंदोलनास भक्कमपणे समर्थन द्यावे असे आवाहन अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी सचिव डॉ. सागर मोरे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या