🌟आरटीओ आणी पोलिस विभागाच्या कारवायानंतरही विद्यार्थ्यांची जीवघेनी वाहतुक सुरुच....!


🌟अशा नियम तोडणार्‍या वाहनांवर कठोर कारवाईची मागणी आता होत आहे🌟

फुलचंद भगत

वाशीम :- मागच्या महिन्यात वाशिमच्या जिल्हाधिकारी यांना लहान विद्यार्थ्यांना आॅटोत कोंबुन नियमबाह्य वाहतुक करीत असल्याचे चिञ दिसल्यानंतर त्वरीत अशा वाहतुकीवर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार आरटिओ आणी पोलीस विभागाकडुन कारवायाचे सञ चालवले पण थोडी मोहीम थंडावताच पुन्हा विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.अशा नियम तोडणार्‍या वाहनांवर कठोर कारवाईची मागणी आता होत आहे.

       क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतुक सुरु असल्यामुळे आरटिओ आणी पोलिस विभागाकडुन कारवाईची मोहिम राबवल्या गेली.प्रशासनाच्या कारवाईने धास्तावलेले वाहन चालक काही दिवस नियमात विद्यार्थ्यांची ने आण करीत होते पण आठच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जैसे थे ची परिस्थीती दिसायला लागली.शेलुबाजार येथुन अकोला रोडने विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला टेंम्पो भरधाव जातांना दृष्टीक्षेपात पडला असुन असेच काहीसे चिञ शहरातही दिसत आहे.पुन्हा विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त नियमबाह्य वाहतुक असल्याचे दिसते.हा जीवघेना प्रवास लहान बालकांच्या जीवावर बेतु शकतो त्यामुळे पालकांनीही काळजी घेवुन अशा नियमबाह्य वाहतुक करणार्‍या वाहनांमधुन विद्यार्थ्यांना पाठवू पाठवू नये तसेच आरटिओ आणी पोलीस प्रशासनानेही ही मोहिम नेहमीकरीता सुरुच ठेवुन नियमबाह्य आणी क्षमतेपेक्षा जादा संख्येने वाहतुक करणार्‍या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या