🌟सन्माननीय जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्तें जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रदान🌟
नांदेड :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आज गुरुवार दि.१५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील समाजसेवक तथा कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदीप गोधने यांना सन्माननीय जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्तें जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रदान करण्यात आला.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते....
0 टिप्पण्या