🌟पाच गावांतील नागरीक रात्र रात्र जागून स्वतःसह स्वतःच्या संपत्तीचे स्वतःच करताय संरक्षण🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याने अनेक गावांतील ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील कंठेश्वर गावात दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चड्डी बनियानधारी शसस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत चार घर व एक पानपट्टी फोडत अंदाजे दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल पळवत एका वयोवृद्ध इसमाच्या डोक्यात चाकूचा वार करीत प्रचंड दहशत पसरवली असाच प्रयत्न दरोडेखोरांनी सातेगावात देखील केला परंतु या गावातील काही लोक तिरुपती बालाजी देवस्थान यात्रेहून ऐन वेळेवर आल्याने प्रयत्न फसला तर असाच धुमाकूळ दरोडेखोरानी गुरवाची बरबडी या गावात घालत गावातील तिन ते चार घर फोडली तर वाणी पिंपळगाव येथील मंदिरातील तिजोरी देखील फोडण्यात आली सावंगी गावात देखील दरोडेखोराचा शिरकाव होत असल्याने या सर्वच गावांतील नागरीक कमालीचे सतर्क झाले असून दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता गावातील नागरीक होशीयार जागते रहों चा नारा देत रात्री १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत रात्र रात्र जागून स्वतःसह स्वतःच्या संपत्तीचे स्वतःच संरक्षण करतांना पाहावयास मिळत आहे.
पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर,सातेगाव,गुरवाची रबडी,सावंगी,वाणी पिंपळगाव ही गावं चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असून कंठेश्वर गावातील घटनेत श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत तरी या चड्डी बनियानधारी दरोडेखोरांचा ठाव ठिकाणा लागला नसल्याचे समजते दरम्यान या दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी आता खुद्द ग्रामस्थांनीच कंबर कसली असून चोर/दरोडेखोरांना गावबंदी केली असल्याचे निदर्शनास येत आहे......
0 टिप्पण्या