🌟सन्मान कर्तुत्वाचा समर्पित समाजसेवेचा....!


🌟पुर्णेतील बुद्ध विहारातील भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत हिराजी भोसले सरांचा सन्मान🌟

अभिनव विद्या विहार प्रशालाचे माजी मुख्याध्यापक सुहागन येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिराजी भोसले सरांचा त्यांच्या अध्यापन सेवेतील समर्पित योगदानाबद्दल व सुहागन येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सात वाजता भोसले सरांच्या निवासस्थानी बुद्ध विहार पूर्णा येथील भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. 

यावेळी भोसले सरांचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ शिक्षक किशोर ढाकरगे, इंजिनीयर विजय खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे, राहुल धबाले अतुल गवळी आनंद जाधव रेनगडे सर  भोसले सर विनायक दुधाटे सर आदींची उपस्थिती होती भारतीय बौद्ध महासभेचे मा. तालुकाध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक यांचा दैनिक क्रांती शस्त्र या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेला लेख "एक आदर्श सुसंस्कृत शिक्षण संस्थाचालक आदरणीय हिराजी भोसले"या लेखाची फोटो फ्रेम शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्या अगोदर आदरणीय हिराजी भोसले सरांनी पूज्य भदंत पयावंश यांचा शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन यथोची स्वागत व सन्मान केला भदंत पयावंश भोसले सरांचे माजी विद्यार्थी एक आदर्श व आवडते शिक्षक म्हणून ते त्यांच्याकडे पाहायचे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या