🌟धाडसी कारवाईत 1,78,950/ रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत🌟
फुलचंद भगत
वाशिम :- दिनांक 08/08/2024 रोजी 21/00 वा पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे गोपनीय माहीती मिळाली की, एक कथिया रंगाची इंडीगो कंपनीची कार क्रमांक एम एच 30- एएफ-1082 मध्ये तीन इसम नकली चलनी नोटा बनविण्याकरीता लागणारे साहीत्य नांदेडवरुन घेवून येत आहे. अशा माहीतीवरुन 23/00 वा सुमारास कारवाई पथक नाकाबंदी करीत असतांना वाशिम कडून एक कथिया रंगाची इंडीगो कंपनीची कार क्रमांक एम एच 30- एएफ-1082 ही येतांना दिसल्याने कारवाई पथकांनी सदर वाहणास थांबविण्याचा इशारा केला असता ती न थांबता कारंजा रोड ने पळून जात असतांना सदर वाहणाचा पाठलाग करुन पकडले आणि सदर वाहणाची झडती घेतली असता त्यामध्ये तीन इसम मिळून आले. त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे 1) शिवाजी साहेबराव खराडे वय 53 वर्ष रा शिवाजी नगर कारंजा 2) शेख जावेद शेख लालन वय 44 वर्ष रा मस्जीदपुरा कारंजा 3) शेर खान मेहबुब खान वय 46 वर्ष रा मोती मस्जीद काझीपूरा कारंजा असे सांगितले.
सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचेजवळ एक भुरकट रंगाची बॅग मिळून आली. सदर बॅगमध्ये काळ्या रंगाचे चलनी नोटाचे आकाराचे कापलेले कागदाचे 16 बंडल मिळून आले. तसेच सदर वाहणामध्ये एक पांढरे रंगाची प्लास्टीक कॅन ज्यामध्ये अंदाजे 2 लीटर कोणत्यातरी द्रव्याने भरलेले मिळून आले. सदर चलनी नोटाचे आकाराचे कागदाचे बंडल आणि द्रव्याबाबत नमुद इसमांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. वरुन त्यांना पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता नमुद इसम यांनी सांगितले की, नमुद चलनी नोटाचे आकाराचे काळ्या रंगाचे बंडल हे नमुद द्रव्याच्या सहाय्याने नकली 500 रुच्या नोटा तयार करण्यासाठी नामे हाजी साब रा नांदेड नावाच्या इसमाकडून नगदी एक लाख रुपये देवून घेवून आल्याचे सांगितले.वरुन तीन्ही इसम यांनी नकली भारतीय चलनी नोटा तयार करण्याचे साहीत्य इतरांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने हाजी साब रा नांदेड नावाच्या इसमासोबत संगणमत करुन त्यांचेकडून नकली नोटा तयार करण्याचे साहीत्य प्राप्त करुन स्वत: जवळ बाळगल्याने नमुद इसमांना नमुद नकली नोटा बनविण्याकरीता उपयोगात येणारे साहीत्या आणि नगदी रुपये तसेच मोबाईल आणि वाहण अशा मुद्देमालासह ताब्यात घेवून नमुद तीन इसम हाजी साब रा नांदेड यांचेविरुध्द पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे दिनांक 09/08/2024 रोजी गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यात दिनांक 09/08/2024 रोजी नमुद तीन आरोपी यांना अटक करण्यात आली असून यातील चौथा आरोपी नसरुल्ला खान अज़ीज खान उर्फ हाजी साब रा नांदेड यास दिनांक 10/08/2024 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतांकडून एकूण 1,78,950 /रुचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि धावळे करीत आहेत.
सदर कारवाई अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम, भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, मा. श्रीमती निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी मंगरुळपीर, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / शिवचरण डोंगरे, पोउपनि / दिनकर राठोड, पोउपनि/राम ढगे, मोहेकॉ/30 संजय घाटोळे, पोकॉ/291 जितेंद्र ठाकरे, पोकॉ/345 माळकर, पोकॉ/275 रफीक, पोकॉ/80 येळणे, चालक/999 उमेश ठाकरे यांनी पार पाडली आहे.वाशिम जिल्हा पोलीस दला मार्फत जनतेला आवाहन करण्यात आले की, कोणीही अशा आमीषाला बळी पडू नये.....
प्रतिनीधी :- फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या