🌟सदरील घटनेची माहिती मिळताच रेल्वे सेना टीम सदस्यांसह रेल्वे पोलिस प्रशासनाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले🌟
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मनमाड रेल्वे मार्गावरील करंजगाव परसोडा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी ६९/४-५ रेल्वे गेट क्रमांक ३० जवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालना वंदे भारत एक्सप्रेस या धावत्या रेल्वे समोर एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान आत्महत्या केलेल्या अंदाजे ३५ वर्षीय महिलेचे नाव सुनिता गजानन सोनवणे राहणार भगुर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहे सदरील घटनेची माहिती मिळताच रेल्वे सेना टीम सदस्यांसह रेल्वे पोलिस प्रशासनाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे.......
0 टिप्पण्या