🌟साहित्य क्षेत्रात जेष्ठ पत्रकार साहित्यिक तथा कवि स.रविंदरसिंघ मोदी लिखित 'अनावश्यक' कविता संग्रह ठरतोय प्रेरणादायी🌟
सिख धर्माचे दहावे गुरु, दशमेश पिता धन धन श्री गुरु गोबिंदसिंघजी साहीब यांच्या पवित्र चरण कमलांनी पावन झालेल्या व सिख धर्मियांसह गुरसिक्खीवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या समस्त मानवजातीची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र हुजूर साहिब नांदेड येथील सामान्य सिख कुटुंबात जन्मलेल्या सरदार रविंदरसिंघ मोदी यांचे शिक्षण एमजे/एमएस,बी.कॉम झालेले असून ते आई.टी.आई.डिप्लोमा धारक देखील आहेत त्यांना सुरवातीपासूनच साहित्य क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्राची देखील आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने स्वतःचे एक वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण दख्खन क्षेत्रात महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषा मराठी भाषेसह हिंदी,पंजाबी तसेच इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व असलेल्या सरदार रविंदरसिंघ मोदी यांनी सामाजिक/धार्मिक तसेच साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केल्याने दख्खनच्या भुमितील अल्पसंख्याक सिख धर्मातील 'कोहिनूर हिरा' म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते म्हणतात ना 'अस्सल हिऱ्याची पारख केवळ जोहरीलाच असते' जोपर्यंत त्याच्यातील चमक/धमक लक्षात येत नाही तोपर्यंत तो एक काचाचाच तुकडा समजला जातो अशी अवस्था आज डोळे असून देखील अंध झालेल्या आणि सुशिक्षित असून देखील संकुचित मनोवृत्तीचा अंगिकार केलेल्या संपूर्ण मानवसमुहाची झाल्याने सरदार रविंदरसिंघ मोदी नामक या 'कोहिनूर हिऱ्याची' अजुनही अनेकांना खऱ्या अर्थाने परख झालेली दिसत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
महाराष्ट्र राज्यातील मातृभाषा असलेल्या मराठी वृत्तपत्र क्षेत्रासह हिंदी,पंजाबी आणि इंग्रजी वृत्तपत्र क्षेत्रात देखील सरदार रविंदरसिंघ मोदी यांनी सत्याची कास धरीत वेळोवेळी सडेतोड जनहीतवादी वृत्तांकन करुन सर्वसामान्य जनतेसह समाजाला देखील प्रत्येकवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला 'अस्सल हिऱ्याची पारख जोहरीलाच असते' या उक्तीला प्रत्यक्षात तंतोतंत खरे सिध्द करीत गाडीपुरा नांदेड येथील रहिवासी भारतीय साहित्य अकादमी आणि विविध शासकीय पुरस्कार प्राप्त साहित्यकार स्वर्गीय डॉ. अशोकसिंह सोलंकी यांनी मराठी/हिंदी/पंजाबी/इंग्रजी क्षेत्रासह पत्रकार व साहित्य साहित्य क्षेत्रात आपल्या लिखाण क्षमतेतून आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या 'अस्सल कोहिनूर हिरा' सरदार रविंदरसिंघ मोदी यांनी लिहिलेल्या जवळपास त्रेचाळीस (43) कविता विश्वास नगर शाहदरा दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्था 'सुरेन्द्रकुमार एन्ड संन्स' यांच्याकडे प्रकाशित करण्यासाठी पाठवल्यानंतर या प्रकाशन संस्थेने सरदार रविंदरसिंघ मोदी यांनी लिहिलेल्या अत्यंत सुंदर हृदयस्पर्शी कवितांची दखल घेऊन सन २०१५ यावर्षी कविता संग्रहाला 'अनावश्यक' हे नाव देऊन सदरील कविता संग्रह प्रकाशित केला जेष्ठ पत्रकार साहित्यकार तथा समाजसेवी सरदार रविदरसिंघ मोदी यांचा हा कवितासंग्रह भावी तरुण पिढीसह साहित्यिक व नवकवींसाठी निश्चितच अंत्यंत प्रेरणादायक ठरणार आहे.
कविता संग्रहाचे नाव जरी "अनावश्यक" असले तरी त्यात समाविष्ट काव्य रचना अधिकत्तर मानवासाठी प्रेरणादायक असे आहेत. विशेष म्हणजे 'अनावश्यक' नावाची कविता जीवनाच्या प्रत्येक अध्यायावर चिंतन कराव्यास लावणारी साहित्यकृति असल्याचे माझे मत आहे.
"जन्म, जीवन और मैं,
बने है त्रिकोण!
अब तक के संघर्ष
रहे व्यर्थ
निरर्थक और
अनावश्यक!
बचपन, जवानी और मैं,
बने है त्रिकोण!
चंचलता
अहलड़ता और
संज्ञानावस्था
लग रहे हैं अनावश्यक!"
वरील कवितेत जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंतच्या विविध आवस्थानवर प्रश्नचिन्ह अंकित करते. तसेच 'समाज' म्हणून आणखीण एक सामाजिक बोध देणारी कविता पठनीय आहे. अशा काव्य साहित्यकृतिचा वेध साहित्य क्षेत्र आणि समाजाने घ्यावा या निष्कर्षावर येऊन मी पोहोचलो आहे.
सरदार रविंदरसिंघ मोदी लिखित 'अनावश्यक' हा कविता संग्रह प्रत्येकांनी आवर्जून वाचावा असा आहे.... दख्खनच्या भुमितल्या साहित्य क्षेत्रातील अनमोल 'कोहिनूर हिरा' अशी ओळख या कविता संग्रहामुळे सरदार रविंदरसिंघ मोदी यांची एक दिवस निश्चितच होणार आहे.....एका कर्तृत्ववान साहित्यिक तथा कविला मानाचा त्रिवार मुजरा.......
आवश्यकतेनुसार कर्तृत्ववान मनुष्याचा वापर करणाऱ्या लोकांसाठी आवश्यकता संपल्यानंतर तो कर्तृत्ववान मनुष्य एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे अनावश्यक ठरू लागतो अश्या या स्वार्थी जगात शेवटी मनुष्याचे अस्तित्वच मनुष्यासाठी अनावश्यक ठरते एवढं मात्र निश्चित असल्याने 'अनावश्यक' या शब्दात अक्षरशः मनुष्य प्राण्याचा खरा चेहरा दडलाय असे मला वाटते.... त्यामुळे जेष्ठ पत्रकार साहित्यिक तथा समाजसेवी सरदार रविंदरसिंघ मोदी यांनी आपल्या 'अनावश्यक' या कविता संग्रहातून या स्वार्थी जगाची एकप्रकारे ओळखच करून दिली आहे.....
✍🏻 व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - लेखक : चौधरी दिनेश (रणजित)
- संपादक/संचालक : जंग-ए-अजित न्युज वेब वृत्तपत्र वाहिनी
0 टिप्पण्या