🌟अभद्र वक्तव्य करणाऱ्या वादग्रस्त संत रामगिरी महाराजाला पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेधार्थ धरणे आंदोलन🌟
पुर्णा (दि.२१ ऑगस्ट २०२४) :- पैगंबर मोहम्मद सल्ललला अलायही व सल्लम यांच्या प्रति अभद्र वक्तव्य करून जगातील व देशातील हिंदू-मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त संत रामगिरी महाराज याचे विरुद्ध कारवाई न करता उलट त्याला संवरक्षण देऊन पाठिशी घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत बरखास्त करण्याचा निवेदन महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे पूर्णा पोलिसांना देऊन जमियत उलमा व पूर्णेतील मुस्लिम समाजातर्फे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील रामगिरी नारायण गिरी महाराज नावाच्या एका वादग्रस्त संताने आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे आदरस्थान संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचे प्रति अभद्र शब्द वापरून त्यांचे चरित्रहीन करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून भारतात सुखाने नांदत असणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या हटवादी व्यक्तीने आपले वक्तव्य ही माघार घेणार नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे व हा इसम महाराष्ट्रात आणि देशभराच्या हिंदू- मुस्लिमांच्या जातीय भवना भडकविण्याचे काम करीत आहे. या प्रकरणी या महाराजावर देशद्रोहा सारखा कठोर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याऐवजी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उलट त्याला संवरक्षण देत पाठीशी घालत आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करत पूर्णा येथील सर्व मुस्लिम बांधवतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आला आहे. तसेच बदलापूर येथे एका अजाण शाळकरी मुलीवर तेथील शाळेतील नराधम सेवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत लैंगिक छळ केला आहे. या निंदनीय घटनेचाही तीव्र निषेध करत सदर पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आला आहे. यावेळी मुफ्ती बिलाल रहेमानी, हाफिज हसन नोमानी, हाफिज अहेमद रजा रिजवी, शेख जावेद शेख मन्नान, सलमान पठाण, सोहेल रब्बानी पठाण, अमजद पठाण मुफ्ती एजाज, मुफ्ती अतिक, शेख खुद्दुस शेख बशीर, अ सलीम, मो. शफी, न से विरेश कसबे, न से अमजद नूरी, रफीख सर, स.आजम अब्बास पठाण सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी धाडसी सामाजसेवक तथा घनदाट मामा मित्र मंडळाचे नेते राजु नारायनकर,न.से. हर्षवर्धन गायकवाड, न से धम्मा जोंधळे, दादाराव पंडीत, जेष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे, मा. न से अब्दुल मुजीब अ. हबीब, स.अतिक नजबोद्दीन आदींनी मार्गदर्शन केले......
* महाराष्ट्रातील खोके बोके सरकारला कायमचे हद्दपार करा - राजु नारायणकर
पुर्णा शहरात आज बुधवार दि.२१ ऑगस्ट रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे श्रध्दास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या बदल अपशब्द बोलणाऱ्या महाराजावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन... करण्यात आले त्या आंदोलन ठिकाणी मला माझं मतं मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल संपूर्ण पुर्णा शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवांचे मनापासून धन्यवाद....मानतो........ महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जाती धर्मात वेगवेगळ्या समाजात वाद निर्माण करून तसेच मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द बोलणाऱ्या महाराजाचे समर्थन करुन येणारी विधानसभा निवडणुक जिंकू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील खोके बोके सरकारला कायमचे हद्दपार करा...*
0 टिप्पण्या