🌟अडचणी उद्भवल्यास जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी केले🌟
परभणी (दि.28 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग परिपत्रकान्वये महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांची ( स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी संस्था आणि महामंडळे वगळून) माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने उपलब्ध करुन दिलेल्या संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये अद्ययावत करण्याचे (किंवा नवीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहिती भरण्याचे) शासनाचे निर्देश आहेत. ही माहिती दि. 1 जुलै, 2024 या संदर्भ दिनांकास अनुसरुन प्रत्येक कार्यालयाने भरावयाची असून दि. 1 सप्टेंबर, 2024 ते दि. 30 नोव्हेंबर, 2024 या कालावधीमध्ये माहिती अचुकपणे भरुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर करावयाची आहे.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, परभणी यांनी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना संगणकीय ऑनलाईन आज्ञावली https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do या संकेतस्थळावर लॉग इन करून माहिती नोंदणी करण्याची तसेच माहितीची द्विरुक्ती होणार नाही. याची दक्षता घ्यावयाची आहे. वरील प्रकारे ऑनलाइन नोंदणी केलेली माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर केल्यानंतर माहिती प्राप्त झाल्याचे प्रथम प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, 2024 मध्ये (November 2024 to be paid in December 2024) व माहितीची तपासणी झाल्यानंतर ती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी, 2025 (February 2025 to be paid in March 2025) जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडून आहरण व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करुन दिले जाईल. सदरचे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर-2024 व फेब्रुवारी-2025 च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतनदेयके कोषागार कार्यालयात स्वीकारली वा परित केली जाणार नसल्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.
शासनाचे निर्देश विचारात घेता, परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती (स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी संस्था आणि महामंडळे वगळून) वरील प्रमाणे संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये अचूकपणे व विहीत कालावधीत भरण्याची दक्षता घेण्याचे तसेच माहिती भरताना काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,परभणी यांनी केले आहे......
0 टिप्पण्या