🌟वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे बंजारा समाजाचा तीजोत्सव उत्साहात साजरा.....!


🌟सतत दहा दिवस चालणारा हा उत्सव बंजारा समाज उत्साहात पार पाडतात🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे दि.29 ऑगस्टला बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार नृत्य व गायन करून तीजोत्सव साजरा करण्यात आला.

             बंजारा समाजात तीज उत्सवाला मोठे महत्त्व आहे, धार्मिक व सामाजिक एकता टिकून राहण्याच्या उद्देशाने गावातील नायक,कारभारी, गावातील नागरिक, महिला व युवकांनी या तीज उत्सवास सहभागी होतात. सतत दहा दिवस चालणारा हा उत्सव बंजारा समाज उत्साहात पार पाडतात. यंदाच्या तीज उत्सवानिमित्त समाज बांधवांनी , आई जगदंबा, संत सेवालाल महाराजांच्या मंदिर संस्थानसमोर डफडीच्या तालावर युवक व युवती, तसेच महिला पारंपरिक नृत्य सादर केले. त्यानंतर संपूर्ण गावातील मुख्य चौकातून मिरवणूक काढून मोरणा नदीत  तीज विसर्जन करण्यात आले. या उत्सवासाठी. गावातील नाईक. बबन गिरधारी राठोड. कारभारी आशिष चव्हाण. शिवलाल राठोड. जगदीश राठोड. सुभाष आडे. धर्मादास चव्हाण. बबन जाधव. प्रदीप आडे. राघला राठोड. धनराज चव्हाण. सुभाष राठोड. मोहन राठोड. समाधान राठोड. प्रताप मामा चव्हाण. अंकुश चव्हाण. सुधाकर राठोड. बाबूसिंग चव्हाण. विशाल राठोड. यांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या