🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रा.किरण सोनटक्के यांची निवड.....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟 

परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२४) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रा.किरण सोनटक्के यांची निवड करण्यात आली.

               मुंबई येथील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या मराठवाडा अध्यक्ष पदी प्रा. किरण सोनटक्के यांना नियुक्तीचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या हस्ते आज शनिवार दि.०३ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आले याप्रसंगी माजी आ.विजय गव्हाणे,नागेश वांगकर व पदाधिकारी उपस्थीत होते.

             दरम्यान, सोनटक्के यांनी सामान्य कार्यकर्ता ते शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या फादर बॅाडीचे शहर जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत. दरम्यान, सोनटक्के यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या