🌟अशी मागणी महिला उन्नती संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे🌟
परभणी :- महिला व विशेषत: मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलून कडक कारवाई करण्याची मागणी ,महिला उन्नती संस्थेने पंतप्रधानाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली, संस्थापक अध्यक्ष डॉ.राहुल वर्मा यांचे मार्गदर्शनाखालील, महिला उन्नती संस्था -भारत तर्फे, दि. 21 ऑगस्ट 2024 या एकाच दिवशी, देशांमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये,संपूर्ण देशामध्ये महिला वरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे, महिला व विशेषत: मुलींना असुरक्षिततेची भावना वाटत आहे. त्यामुळे महिला व मुलींना जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .याबाबत भारत सरकारने ठोस पावले उचलून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी ज्यामुळे असे प्रकार करण्याचे धाडस गुन्हेगारांना होणार नाही व महिला आणि मुलींना निर्भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल असे नमुद करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्याधिकार्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात येणारे निवेदन उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचेकडे सुपूर्द करण्यात आले असून या निवेदनावर महिला उन्नती संस्थेचे महाराष्ट्र प्रभारी मदन(बापू)कोल्हे ,महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीदेवी पाटील, मीडिया चीफ देवानंद शंकरराव वाकळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या