🌟शिवसेनेच्या परभणी महानगरप्रमुख पदावर नितेश देशमुख यांची निवड.....!


🌟राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नितेश देशमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले🌟

परभणी (दि.१० ऑगस्ट २०२४) : शिवसेनेच्या परभणी महानगरप्रमुख पदावर महाराजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नितेश देशमुख यांना महानगरप्रमुख पदाच्या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

यावेळी आमदार संतोष बांगर, हिंगोलीचे युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम,अ‍ॅड.अमोल देशमुख आदी उपस्थित होते दरम्यान, देशमुख यांची या पदासाठी निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरापासून समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठी मोटारसायकल रॅली काढली. तत्पूर्वी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विविध ठिकाणी देशमुख यांचा सत्कारही करण्यात आला. अपना कॉर्नर जवळ लाडू तुला करण्यात आली. दरम्यान, या रॅलीत जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, धम्मदीप रोडे, माजी नगरसेवक शेख शब्बीर, नसीर खान सरफराज खान, वैभव काकडे, देवेंद्र देशमुख, चंदु मोरे, गजानन चिंचोलीकर, कृष्णा देशमुख, सुरज चोपडे, ऋषिकेश लंगोटे, नरेश लंगोटे, वैभव देशमुख, पवन चव्हाण, स्वप्नील कदम, प्रतिक किसोडे, गोविंद शिंदे, गोपाल देशमुख, गोटू डाके, आकाश मानवतकर, अमर देशमुख सहभागी होते. या रॅलीने सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या