🌟परभणी येथे वामनदादा कर्डक जनशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा....!


🌟अभिरा फाउंडेशनच्या वतीने जनशताब्दी महोत्सवाचे आयोजन🌟 


परभणी :- परभणी येथील अभिरा फाउंडेशनच्या वतीने वामनदादा कर्डक यांचा जनशताब्दी महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा शहरातील बी रघुनाथ सभागृहात 22 ऑगस्ट रोजी  संपन्न झाला या महोत्सवाचे उद्घाटन संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अधक्ष्यस्थानी उद्योजक मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक प्रा.डॉ.भीमराव खाडे हे होते या वेळी मंच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख शेकाप परभणी जिल्हाध्यक्ष भाई कीर्ती कुमार बुरांडे डॉक्टर बी टी धुतमल आयोजक भंते मुदीतानंद ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके,डॉ सुनील तुरुकमाने,यशवंत मकरंद,पंकज खेडकर,राजेश रणखांब यांची उपस्थिती होती.आंबेडकरी जलासाकर गीतकार,गायक तसेच सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.डी आर तूपसमिंदर, रानबा गायकवाड,चंद्रकला गायकवाड,शाहीर नामदेव लहाडे यांना या वर्षीचा महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला प्रस्ताविक आयोजक भंते मुदितानंद यांनी केले तर सूत्रसंचालन संजय बगाटे व लक्ष्मी लहाने यांनी केले.....

*******************************************

* भन्ते मुदितानंद थेरो यांच्या अभिरा फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांचा सन्मान :-


पूज्य भन्ते मुदितानंद थेरो यांच्या अभिरा फाऊंडेशन परभणी तर्फे महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होता आले याप्रसंगी एलआयशी कर्मचारी संघटनेचे नेते दशरथ तूपसुंदर,शाहीर नामदेव लहाडे, राणबा गायकवाड, गायिका चंद्रकला गायकवाड यांचा वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी परभणी भाजपचे नेते आनंद भरोसे,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत,भाजपचे परभणी शहराध्यक्ष राजेश देशमुख,प्रा डॉ भिमराव खाडे, डॉ भगवान धूतमल,कॉ.किर्तीकुमार बुरांडे,सूर्या हॉस्पिटल चे संचालक डॉ संजय खिल्लारे, करण गायकवाड,प्रा यशवंत मकरंद,प्रा डॉ सुनील तुरूकमाणे,पंकज खेडकर,प्रा राजेश रणखांबे,पत्रकार संजय बगाटे, उमेश शेळके व कार्यक्रमाचे संयोजक भन्ते मुदितानंद उपस्थित होते....

स्थळ:-बी रघुनाथ सभागृह परभणी

दि:-22 ऑगस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या