🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी दीक्षारंभ कार्यक्रम....!


 🌟तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० कार्यशाळाही संपन्न 🌟 


पुर्णा :- पुर्णा येथील श्री.गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ तसेच तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० कार्यशाळा घेण्यात आली. दीक्षारंभ (स्टुडेंट इंडक्शन प्रोग्रॅम) मध्ये प्राचार्य डॉ.  के. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत केले तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विविध समित्या आणि सोई सुविधा यांची माहिती देताना विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर असेल याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी मुलांचे मोबाइलच्या अति वापरामुळे खूप नुकसान होत असून मोबाइलचा वापर नियंत्रित असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  


या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अमलबजावणी समितीचे समन्वयक प्रा. डॉ. संजय दळवी यांनी संसाधन व्यक्ति म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मुख्य (मेजर) विषय, किरकोळ (मायनर) विषय, 'कौशल्य शिक्षण’, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) तसेच नवीन शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण आराखडा याची अद्ययावत आणि सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केले आहे. सदरील धोरनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी सखोल माहिती प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच विद्यार्थी विकास समिति यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  उपप्राचार्य डॉ गजानन कुरूंदकर यांनी विद्यार्थ्याना महाविद्यालयात शिस्त आणि सलोखा राखण्याचे आवाहन करताना विद्यार्थ्यानी फक्त नोट्स वर अवलंबून न राहता जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे असे सांगितले. कार्यशाळेच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि दीक्षारंभ तसेच कार्यशाळा घेण्यामागील उद्देश याबद्दल माहिती दिली. डॉ. ओंकार चिंचोले यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. विजय पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ.प्रकाश भांगे, डॉ. रवींद्र राख, डॉ.सोमनाथ गुंजकर, डॉ. संदीप शिंदे, श्री मंचक वळसे, भगुसिंह बायस आदींनी परिश्रम घेतले.

दीक्षारंभ तसेच रा.शै.धो.-२०२० कार्यशाळा घेतल्याबद्दल श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य  महाराज,  संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे,  सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमराव कदम  यांनी संयोजन समितीचे अभिनंदन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या