🌟परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक धोरणांविरोधात उद्या धरणे आंदोलन...!


🌟आंदोलनास विविध संघटनांनी दर्शवला जाहीर पाठींबा🌟

परभणी (दि.०५ ऑगस्ट २०२४) : मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संलग्न परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शासनाच्या विविध शैक्षणिक धोरणांच्या विरोधात उद्या मंगळवार दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

             राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व ०१ नोव्हेंबर २००५ नंतर अनुदानावर आलेल्या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी.१५ मार्च २०२४ चा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे. १५ मार्च २०२४ रोजीचा वर्ग ०५ वी व ०८ वीच्या वर्गाचा दर्जा वाढ निर्णय तात्काळ रद्द करावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तात्काळ सुरू करावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करावी.०१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

             आदी मागण्यांसाठी उद्या मंगळवार दि.०६ ऑगस्ट रोजी दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष देविदास उमाटे कार्यकारीणी सदस्य गणेश शिंदे, शिवाजी पाचकोर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बालासाहेब भांगे, सचिव देवानंद अंबुरे, उपाध्यक्ष दिगंबर मोरे, राजकुमार धबडे, सहसचिव उपेंद्र दुधगावकर, कोषाध्यक्ष रंगनाथ चव्हाण सह कोशाध्यक्ष विष्णूमुंढे, प्रसिद्धीप्रमुख गोविंद चोरघडे, संस्थाचालक संघटनेचे राज्यसचिव माजी आमदार विजयराव गव्हाणे, राज्य संघटक रामकिसन रौंदळे, महानगर जिल्हाध्यक्ष विवेक नावंदर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष धारासुरकर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, सचिव बळवंत खळीकर, उपाध्यक्ष सूर्यकांत हाके, मु. अ. संघाचे प्रकाश हरगावकर, निशांत हाके, सौ. जया जाधव, श्रीमती वंदना कुंभेकर, राजेंद्र कांबळे, श्यामसुंदर शेळके, बळीराम वटाणे, शेख अक्रम, गणेश शिंगोटे,  रामदास मुंढे सारंगधर पवार, उद्धव भुसारे शिवसांभ उर्फ बाबा सोनटक्के, प्रदीप कौसडीकर आदींनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या