🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांची राज्यसभेतून मागणी🌟
परभणी (दि.०६ ऑगस्ट २०२४) :- ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुलांच्या मनावर होणार्या परिणामांविषयी तिव्र चिंता व्यक्त करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी ऑनलाईन गेमिंग कायद्यात सरकारने तात्काळ सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यसभेत श्रीमती खान यांनी पबजी, कॉल ऑफ ड्यूटी, ग्रँड थेफ्ट ऑटो (जीटीए), आणि द ब्लू व्हेल सारख्या गेम्सचा उल्लेख करताना, हे गेम्स मुलांना हिंसक वर्तनासाठी प्रवृत्त करत असल्याचे सांगितले. अशा गेम्सवर भारतात बंदी असतानाही हे सहज उपलब्ध होत आहेत, असे नमूद करीत खान यांनी 24 जुलै रोजी घडलेल्या एका दुःखद घटनेचा हवाला देऊन अशा गेम्सवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली.
भारतात सध्या या विषयावर विशिष्ट कायद्यांचा अभाव असल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे २०२३ च्या सिनेमॅटोग्राफ कायदा आणि डिजिटल कायद्यांसह व्हिडिओ गेमचे नियमन करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही खासदार खान यांनी म्हटले......
0 टिप्पण्या