🌟नगर परिषद सर्व विभागातील कामकाज ठप्प,नागरिकांची गैरसौय🌟
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जुनी पेशन योजना व इतर विविध मागण्यासाठी नगर परिषद /नगर पंचायत कर्मचारी यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. यासंपामध्ये परळी वैजनाथ येथील नगर परिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच घोषणा देऊन शासनाचे निषेध व्यक्त केला जात आहे. जो पर्यंत आमच्या मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरु राहणार असल्याची प्रतिक्रिया संप कर्त्यांनी दिली आहे. संपावर कर्मचारी गेल्यामुळे नगर परिषद सर्व विभागातील कामकाज ठप्प होऊन नागरिकांची गैरसौय झाली होती.
राज्यातील सर्व नगर परिषद नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्याचे शासनाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत होते. त्या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत 2005 साली लागू झालेली dcps पेन्शन योजना आणि 2015 साली लागू झालेली NPS पेन्शन योजना प्रत्यक्षात लागू झालेली नाही. शासनाचे विविध विभाग नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीच मानायला तयार नाही ही अत्यंत खेदाची बाब असून या विरोधात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. नगरपरिषद/नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या पुढीलप्रमाणे जुनी पेंशन योजना लागू करणे किंवा नविन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी करणे., राज्य संवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करुन सेवार्थ नंबर मिळणे., सहायक अनुदान एक महिना आगाऊ देणे, सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई फरक रक्कम मिळणे, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १०, २०,३० लागू करणे, राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी वगळणे, पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पद तात्काळ भरणे, मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परिक्षा तात्काळ MPSC मार्फत घेणे, सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी निवृत्ती रक्कमांचे अनुदान मिळणे, धारणाधिकार सह नियुक्ती व बदली पदस्थापना करणे, नियोजित शासकीय संघटना प्रस्तावानुसार संघटनेची नोंदणी करण्यात यावी. तसेच नगरपरिषद/नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या, वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे. संवर्ग सेवेतील श्रेणी-अ. पदास गट-ब (राजपत्रित) दर्जा आणि श्रेणी-ब पदास गट-ब (अराजपत्रित) दर्जा मिळणे, सहायक आयुक्त/मुख्याधिकारी गट-ब (राजपत्रित) पदावर ६०% जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने भरण्यात याव्यात., कर व प्रशासकीय, अग्निशामक आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतनश्रेणी ४२००/एस-१३ करावी., अभियांत्रिकी संर्वगातील अभियंता यांना इतर विभाग प्रमाणे पदनाम व वेतनश्रेणी लागु करावी. अ वर्ग नगरपरिषद CAFO पदावर संवर्ग सेवेतील लेखा अधिकारी नियुक्ती करावी., पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता संबर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावी. संगणक, अग्निशमन व विद्युत या संवर्गाची पदे नगरपंचायतींमध्ये निर्माण करावी., क वर्ग नगरपरिषदांना उपमुख्याधिकारी हे पद निर्माण करावे, राज्य संवर्ग श्रेणी-क पदांवर २५% जागा नगरपरिषद कर्मचारी यांची स्वतंत्र परिक्षा किंवा सेवा ज्येष्ठताने भरावी. संवर्ग अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. जुनी पेन्शन योजना व संवर्गाचे मूलभूत समस्या/मागण्यावर शासन स्तरावर मोठे दुर्लक्ष झाले असल्याने 29 ऑगस्टपासून सर्व संघटनासह संपात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने यावेळी घेण्यात आला. सदरच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर विनंती करण्यात येते की, समस्या व मागण्यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी. ही नम्र विनंती. या संपात परळी वैजनाथ नगर परिषद कार्यालयीत सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे नगर परिषद विभागातील सर्व कामकाज ठप होते. यांमुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. यावेळी नगर परिषद कार्यालयातील उपमुख्यधिकारी संतोष रोडे,शंकर साळवे, अजय कलंत्री व इतर कर्मचारी उपस्थितीत होते.........
0 टिप्पण्या