🌟मंत्री आदिती तटकरे या पाथरी रोडवर आयोजित महिला मेळावा व बचत गट मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करणार🌟
परभणी :- राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्रीमती आदिती वरदा सुनील तटकरे या उद्या रविवार दि.११ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
श्रीमती आदिती तटकरे ह्या छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी निघत असून, दुपारी १२:३० वाजता परभणी येथील पाथरी रोडवर महिला मेळावा व बचत गट मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत त्यांची वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी वेळ राखीव राहणार असून, सायंकाळी ४ वाजता त्या मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील....
0 टिप्पण्या