🌟परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाद्वारे मागणी🌟
परभणी/सेलू (दि.21 ऑगस्ट 2024) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या संदीप रोहीदास गायकवाड यांच्या कुटूंबियांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने केली.
सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दि.21 ऑगस्ट रोजी महसुल प्रशासनास या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, तालुक्यातील देऊळगाव गात येथील संदीप गायकवाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून 29जून 2024 रोजी गळफास घेऊन आपले जीवन मराठा समाजासाठी संपवले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियास शासनाद्वारे 25 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व परिवारातील एकाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जयसिंग शेळके, श्याम कदम, सचिन कदम, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर कदम, चैतन्य कदम, रवि मोगल, किरण कदम, मच्छिंद्र कदम, गौरव कदम, अर्जुन कदम, सुधीर कदम, आकाश गोरे, सचिन सोळंके, सचिन गोरे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.....
0 टिप्पण्या