🌟तक्रारकर्ते आमरण ऊपोषणावर ठाम : घरकुल न बांधताही शासनाचा निधी हडप करणाऱ्यांवर कारवाई होणार कधी ?🌟
🌟शासनाच्या निधीला चुना लावणार्यावर कारवाई होणार की 'घेवुन देवुन सेटलमेंट' करणार ? जनसामान्यांना पडला प्रश्न🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे काहींनी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल न बांधताही जुनेच घर दाखवुन शासनाचा निधी हडपल्याची लेखी तक्रार अतुल उमाळे यांनी प्रशासनाकडे केली होती.पण ज्यांनी संगनमत करुन जुनेच घर दाखवुन निधींचा अपहार केला त्यांनीच चौकशी करुन अहवाल सादर करुन प्रकरणी सारवासारव केल्याचा अजब कारभार केल्याने सर्वञ आश्चर्य व्यक्त होत आहे.ज्यांचेविरुध्द तक्रार आहे त्यांच्या वरिष्ठाकडुन चौकशी होणे अपेक्षीत असतांनाही हे 'अकलेचे तारे'कसे तोडले हा प्रश्न तालुकावाशीयांना पडलेला आहे.याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसुन दोषींना पाठीशी तर घातल्या जात नाही ना असा प्रश्न ऊपस्थीत होत असुन कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देवू स्वतः घरकुल प्रश्नाची 'स्पाॅट पाहणी' करावी अशी मागणी आता होत आहे.
वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२३ ते २०२४ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता तर काहींना दुसराही हप्ता वितरित करण्यात आला.शंभर दिवसात बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असतांनाही घरकुलांचे बांधकाम सुरूच झालेले नसल्याचे समोर आले तर काहींनी अर्धेच बांधकाम करुन काम थंडबस्त्यात ठेवलेले दिसते.काही ग्रा.पं.कडुन सात दिवसात घरकुलाचे काम पुर्ण करण्याच्या नोटीसही देण्यात आल्याने खळबळ ऊडाली आहे परंतु या नोटीसाठी जणु हवेतच विरल्या कारण यावरही पुढे कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसते.घरकुल न बांधताच नीधी हडप केल्याची बाब या नोटीशीव्दारे तक्रारकर्त्याने ऊपस्थीत केलेला मुद्दा तर दाबायचा नाही ना अशी शंका आता निर्माण होत आहे.ज्यांनी घरकुल लाभार्थ्यांशी हितसबंध साधत जुनेच घर असुनही घरकुल न बांधता पुर्ण हप्ते काढल्याची तक्रार अतुल ऊमाळे यांनी करुन प्रशासनाला ऊपोषणाचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ ऊडाली.तक्रारकर्त्यांनी माहीती परिपुर्ण न देता दिशाभुल करणारी अर्धवट दिली.प्रत्येक स्टेपला जिओ टॅंगीगचे फोटो न घेण्याचे कारण काय?तसेच दिलेल्या माहीतीनुसार सबंधितांनी घरकुल पुर्ण केल्यावरच चारही हप्ते दिल्याचे चौकशी अहवालात नमुद आहे.परंतु सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ग्रामपंचायत सचिव,सबंधित ग्रा.पं.पदाधिकारी,घरकुल विभाग यांनी संगनमत करुन शासनाची दिशाभुल करुन निधीचा गैरप्रकार केल्याची तक्रार असतांनाही सदर चौकशी ही सचिव,सरपंच,रोजगार सेवक व ग्रा.पं.कर्मचारी यांनी चौकशी करुन अहवाल बनवुन तक्रारकर्त्याला सादर केला आहे तसे गटविकास अधिकारी यांनी लेखी कळवले.ज्यांचेविरोधात तक्रार आहे त्यांचे वरिष्ठ गटविकास अधिकारी किंवा जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी किंवा तत्सम वरिष्ठ अधिकार्यांकडुन चौकशी होणे अपेक्षित असतांना शासनाला चुना लावणारेच चौकशी करुन 'अकलेचे तारे'तोडत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने असुन ही सावरासारव आता चालणार नाही,मी आमरण ऊपोषणावर ठाम आहे असे तक्रारकर्ते अतुल ऊमाळे यांनी या प्रकरणी सांगीतले आहे.
* घरकुल न बांधताच जुने घर दाखवुन निधी हडपणारांवर प्रशासन कधी कारवाई करणार ?
मंगरुळपीर तालुक्यात काही लाभार्थ्यांनी अधिकार्यांशी व सबंधीत कर्मचार्यांशी हितसबंध साधत शासनाला चुना लावला आहे.घरकुल मंजुर झाल्यावर जुनेच घर दाखवुन सर्वच्या सर्व हप्ते निधीची ऊचल करुन शासनाला फसवल्याचा प्रकार घडल्याच्या लेखी तक्रार अतुल ऊमाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.या तक्रारीची चौकशी सध्या गुलदस्त्यातच दिसते.दोषींवर गुन्हे दाखल होणार की घेवुन देवुन सेटलमेंट होणार याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकार्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील घरकुल तक्रारीची स्वतः स्टाॅट पाहणी चौकशी करावी अशीही मागणी जोर धरत आहे......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या