🌟बांगला देशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून तिव्र निषेध....!


🌟प्राणाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात दिले निवेदन🌟


परभणी : बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील कट्टर पंथीय यांच्या कडून सामूहिक हल्ले होत अन्याय अत्याचार केला जात आहे.

सदरील घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करत आज बारा ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. सदरील निवेदनात असे म्हटले आहे की बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा होणे गरजेचे आहे केंद्र सरकारने यासाठी कठोर पावली उचलणे आवश्यक आहे जर का लवकरात लवकर बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी नाहीतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही दिलेल्या निवेदनच्या माध्यमातून निवेदनकर्त्याणी सांगितले.

या निवेदनावर आंतरराष्ट्रीय हिंदू  परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री प्रकाश लाखरा, परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश जांगिड,प्रांत संघटन मंत्री विकास रेंगे अभिजीत गेडाम,ईश्वर सेठ शर्मा, हनुमान भरोसे,मदन तम्यवार,निलेश बेंडसुरे,सौ.माधुरी सराफ,सौ.प्रीती परळीकर, सौ प्राजक्ता कानखेडकर, सौ सुचिता कमटलवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या