🌟श्रीकृष्ण : श्रीकृष्ण राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही.....!


🌟प्रत्येकाला आपल्या आयुष्यात श्रीकृष्णासारखा एक मित्र पाहिजे एक सखा पाहिजे...एक हक्काचा माणूस पाहिजे🌟

✍️मोहन चौकेकर

*श्रीकृष्ण राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही.*

*श्रीकृष्णाने प्रेम राधेवरही केले आणि अर्जुनावरही.*

*राधा आपली नव्हती आणि होणारही नाही याची पूर्ण जाणीव श्रीकृष्णाला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती.*

*पण*

*हे असूनही श्रीकृष्णाने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !*

*एकदा गोकुळ सोडल्यावर परत श्रीकृष्ण कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही,

*आणि* 

*राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यातही श्रीकृष्ण परत कधीच आला नाही.*

*अत्यंत उत्कटपणे नाती निभावूनही त्या नात्यातून श्रीकृष्ण अलगदपणे बाजूला झाला परत कधीच परतून न येण्यासाठी !!*

*त्याची श्रीकृष्णाला कधी खंत वाटली नाही, ना कधी खेद झाला.

*श्रीकृष्णाने राधेबरोबर प्रेमाचे हळूवार नाते जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही.*

*ज्या उत्कटतेने श्रीकृष्णाने राधेसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुनाबरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुटनीतीने गाजवले.

*राधेला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे, त्याच आपुलकीने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हेही सांगितले.*

*एकापेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले, जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता.*

*ज्या हळूवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत.*

*हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही.

कारण,

*कारण तो श्रीकृष्ण होता*

*संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतःचे वचन आहे.*

*श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात होता, आहे आणि राहील. गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची *

*आयुष्यात कधी कोणाला गुरू करायचा असेल तर नेहमी कृष्ण हा समोर असू द्या.*

*श्रीकृष्ण राधेचा, गोपीचा, सुदामाचा, अर्जुनाचा प्रेमळ मित्र,  जिवलग सखा होता , श्रीकृष्ण धुरंधर राजकरणी, कुटनीतीकार अश्या वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत श्रीकृष्ण स्थिर राहिला होता.*

*आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा  शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख*   🌹🌹💐💐🚩 

*दहीहंडी हा एकच सण असा आहे ज्यात आपला माणूस आपल्या माणसाला* *वरती जाण्यास मदत करतो,  इतर वेळेस एकमेकांचे  पाय ओढतो परंतु तसे न करता इतर वेळेस पण अशीच मदत करावी हिच या निमित्ताने अपेक्षा.....!!

*अश्या आपल्या मराठमोळ्या दहीहंडी व गोकुळ अष्टमी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!!!  शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख*🌹🌹💐💐🚩प्रत्येकाला आपल्या  आयुष्यात श्रीकृष्णासारखा एक मित्र  पाहिजे एक सखा पाहिजे, एक हक्काचा माणूस पाहिजे.*

 * सर्वांना श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या  मनापासून हृदयापासून खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख......                                      🌹🌹💐💐🚩🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या