🌟महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे रॅलीचे आयोजन🌟
🌟मंगरुळपीर शहरातुन विविध सामाजीक संघटनांच्या पुढाकारातुन आयोजन🌟
फुलचंद भगत
वाशिम:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता रॅलीचे आयोजन दि.३ सष्टेबर रोजी करण्यात आल्याचे लेखी निवेदन वाशिम जिल्हाधिकारी बुवणेश्वरी एस.आणी वाशिम पोलिस विभागाला दि.२९ आॅगष्ट रोजी दिले आहे.
बदलापूरमध्ये एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचं तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजावत आहेत, असं संतप्त नागरिकांचं म्हणणे आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे.लहान मुली महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.लहान मुली-महिलांवर सुरक्षित नाहीत. समाजात जनजागृती झाली पाहिजे.आपण जागरूक राहिले पाहिजे.लहान मुली महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कायद्याने कठोर शिक्षा मिळायला हवी.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला मातेचे स्थान आहे. त्या प्रमाणे आपण वागले पाहिजे. तिचे सरंक्षण करणे आपली सर्वांची जबादारी आहे.आपली नैतिकता ठेवून महिलांच्या मागे ठाम पणे उभे राहिले पाहिजे.समाजातील विकृतीला विरोध केला पाहिजे. महिलांसाठी अनेक कायदे असूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नाही अशी शोकांतीका पाहावयास मिळत आहे.अशा महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संवैधानिक मार्गाने मंगरुळपीर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासुन छञपती शिवाजी महाराज चौक,बिरबलनाथ महाराज मंदीर ते तहसिल कार्यालय अशा मार्गाने शांततामय मार्गाने रॅलीचे आयोजन करणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी तसेच वाशिम पोलिस विभागाला विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन प्रशासनाला देण्यात आले आहे.सदर निवेदनावर चंचल खिराडे,सुनिता खिराडे,भावना बाबरे,मनिषा पांडे,राधा केदार,रंजना बोरकर,चंदा ठाकुर,सुनिता पाटील,नम्रता पाटील,गिता वोरा,सविता पुरोहित,सुनिता वानखडे,अनिता वाघमारे आदींच्या स्वाक्षर्या आहेत......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या