🌟'कोणता नेता घेवु माथी'मंगरुळपीर येथे भाजपात अंतर्गत धुसपुस;सभेमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष....!


🌟कार्यकर्त्यांना चिल्लर समजल्यामुळेच लोकसभेमध्ये पत्करावा लागला पराभव🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानीक विश्रामगृहात दि.४ आॅगष्ट रोजी झालेल्या एका महत्वाच्या मिटिंगमध्ये भाजपामधील अंतर्गत धुसपुस पाहावयास मिळाली.कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तसेच कोणतेही महत्व न देता लोकप्रतिनीधी व पक्षाचे काही वरिष्ठ प्रतिनीधी काम करत असल्याने आणी निष्ठावानांना फक्त तडवं ऊचलण्याचेच काम ठेवत असल्याने भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सुर ऊमटला होता.याचमुळे लोकसभेत परावाला पक्षाला सामोरे जावे लागले अशी चर्चाही झाली.नव्या दमाची कार्यकारीनी अपयशी ठरत असल्याने खांदेपालट हवी अशीही दबक्या आवाजात चर्चा रंगली होती.

       जिल्हामध्ये भाजपाला ऊतरती कळा लागल्याल्याचे सर्वश्रुत असुन लोकसभेत तसा प्रत्ययही पाहावयास मिळाला.मंगरुळपीरमध्ये भाजपात तिन गट पडल्याने प्रत्येक गट आपापल्या कार्यशैलीने काम करु बघत असल्याने साहजीकच दुसरा गट नाराज होतांना दिसतो.हॅट्रिक घेतलेल्या आमदाराचा एक गट,नव्या दमाची कार्यकारीनीचा दुसरा गट व तालुक्यात शुन्यातुन पक्षाला अच्छे दिन दाखवले त्या निष्ठावान सुरेशभाऊंचा तिसरा गट अशा तिघेही गटात पक्ष विभागला गेल्याचे दिसते.सत्ता भोगणारांना आता थांबवुन नवा ऊमेदवार द्यावा असा सुर ऊमटवणारा कालच दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आता अंतर्गत बंडाळी करायची जणु तयारी केल्याचे दिसते.जो तो मीच सच्चा या अर्वीभावामुळे पक्षाला खिंडार पडलेले दिसते.खासदारकीत पक्षाला मतदारसंघात तोंडघशी पडायची नामुष्की ओढवली होती तिच परिस्थीती आता विधानसभेतही दिसते.पक्षश्रेष्ठीला नाराज कार्यकर्त्यांना समजावता समजावता नाकी नऊ येत असल्याने 'कोणता नेता घेवू माथी' ही परिस्थीती झाली आहे.एकवेळ अशी होती की तालुक्यात भाजपाला कुणी विचारत नव्हते त्या कठीण परिस्थीतीत काही निष्ठावान भाजपा पदाधिकार्‍यांनी पक्षाची नौका पैलतीरी पार करुन पक्षाला अच्छे दिन दाखवले त्यामुळे केंद्रात आणी राज्यातही सत्ता भोगता आली.पण कानामागुन आलेल्यांनी ही नौकाच बुडवण्याची जणु तयारी चालवलेली दिसते.तिन गटातील अंतर्गत धुसपुस तालुक्याला नविन नाही जर अशीच परिस्थीती राहली तर विधानसभेमध्ये टिकिटावरुनही अंतर्गत बंडाळी होवुन आमदारकीलाही मुकावे लागेल हे माञ नक्कीच.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या