🌟अशी माहिती शिवसेना विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिली🌟
✍️ मोहन चौकेकर
संभाजीनगर : महाराष्ट्र विकास आघाडी संभाजीनगरच्या वतीने शनिवार ता. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचारच्या घटनेचा निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती शिवसेना विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिली उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बाबत दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत असलो तरीही महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
याप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना सह संपर्कप्रमुख विजयराव साळवे, त्र्यंबकराव तुपे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, काँग्रेस शहराध्यक्ष युसूफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, महानगर प्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, आनंद तांदुळवाडीकर, बंडू ओक, अनिल पोलकर, सुधीर नाईक, संतोष खेंडके, सचिन जव्हेरी, रतन साबळे, संजय बारवाल, दिगंबर घोगरे, किशोर कच्छवाह, राजेंद्र राठोड, शिवा लुंगारे,श्रीरंग आमटे, हिरा सालमपुरे, लक्ष्मीनारायण बखारिया, राजू इंगळे, बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी शिवसेना सह संपर्क संघटिका सुनिता अऊलवार, सुनिता देव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया जंगले, शहराध्यक्ष मेहरज पटेल, दिपाली मिसाळ, उपजिल्हा संघटिका दुर्गा भाटी, मीना फसाटे, नलेनी बाहेती, जयश्री लुंगारे, अनिता मंत्री, सुनंदा खरात, भागू आक्का शिरसाट, सुनिता सोनवणे, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, युवा सेना हनुमान शिंदे, अजय चोपडे, स्वप्निल डीडोरे, रामेश्वर कोरडे व सागर खरगे यांनी केले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या