🌟या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करुन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले🌟
परभणी (दि.14 ऑगस्ट 2024) : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार, दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
*प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ :-
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार, दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता प्रशासकीय इमारत, परभणी येथे राष्ट्रध्वज रोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते पार पडणार आहे भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.......
*****
0 टिप्पण्या