🌟दि.चिखली अर्बन बँकेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.....!


🌟चिखली अर्बन बँकेने बॅकींक सोबत सामाजिक कार्याला नेहमी प्राधान्य दिले -  सतिश गुप्त


 (
चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिशभाऊ गुप्त)

✍️ मोहन चौकेकर 

चिखली - सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि.चिखलीची 63 वी आमसभा रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली.सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात येऊन सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


रानवारा येथे संपन्न झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त होते. मंचावर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले,प्रदीप वडनेरकर, युवराज रामसिंग पवार, सौ.रत्नाताई युवराज पवार,पुरुषोत्तम दिवटे, विश्वनाथ जीतकर राजेंद्र शेटे, गणेश मांन्टे,सौ. सुनीताताई भालेराव ,जीवन सपकाळे, मनोहर खडके, सुधाकर कुलकर्णी,डॉ.राजेंद्र भाला ,सुशील शेटे, शैलेश बाहेती, श्यामसुंदर पारिख,सौ. मंजुताई कोठारी,राजेश व्यवहारे,आनंदी जेठांनी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष रामदासजी बिडकर, सदस्य अशोक पाटील, डॉ.आशुतोषजी गुप्ता, माजी संचालक रामकृष्ण दादा शेटे ,प्रेमराजशेठ भाला,विजय कोठारी, दादाराव तुपकर, विलास सावजी, माई भवर, सरलाताई भवर ,सुशील ओस्थावाल,सरव्यवस्थापक शशांक पंधाडे, कर्मचारी प्रतिनिधी अरविंद सुरंगळीकर, प्रकाशबुवा जवंजाळ,पंडितराव देशमुख व शाखा सल्लागार हे प्रामुख्याने उपस्थित होते.बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त, फासेपारधी समाजासाठी अहोरात्र  झटणारे युवराज रामसिंग पवार, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, पुरुषोत्तमजी दिवटे व इतर मान्यवरांनी श्री लक्ष्मी मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.त्यानंतर विद्यानिकेतन कला अकादमी कडून स्वागत गीत सादर करण्यात आले. सभेमध्ये मागील वर्षी दिवंगत झालेले बँकेचे संचालक ,कर्मचारी ,सभासद , ठेवीदार,हितचिंतक ,हुतात्मा सैनिक , दिवंगत शास्त्रज्ञ , दिवंगत पत्रकार, कलाकार ,साहित्यक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

समाज उन्नतीसाठी आर्थिक ,शैक्षणिक, सहकार, अध्यात्मिक, वैज्ञानिक, क्रीडा, यामध्ये अवलोकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा बँक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करते चिखली अर्बन बँकेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा पारधी समाजासाठी अहोरात्र झटून समाजातील तळागाळातील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारे  युवराज रामसिंग पवार यांना चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदीपजी वडनेरकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त म्हणाले की केवळ नफा आणि बँकेची प्रगती हे डोळ्या समोर न ठेवता समाजकार्य म्हणजे आपले समाजाप्रती असलेले देणे हे बँक कधीच विसरली नाही .महिला स्वावलंबी होण्यासाठी व महिला सबलीकरण करण्याकरिता बचत गटाची स्थापना करून त्यांना कर्ज पुरवठा करीत आहे .आजपर्यंत ३५००० पेक्षा जास्त महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. बँकेचे ठेवीदार,खातेदार ,कर्जदार आणि सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे .त्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे बँकेची घोडदौड आज वेगाने सुरू आहे. एकतीस शाखा व सहा ग्राहक सुविधा केंद्र असलेली चिखली अर्बन बँक आज 63 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर बँकेची ही यशस्वी व नेत्रदिप वाटचाल सुरू आहे.यानंतर फासेपारधी समाजासाठी कार्य करणारे युवराज पवार,विद्याधर महाले व प्रदीप वडनेरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. बँकेच्या संचालक मंडळांनी सभेसमोर पत्रीकेतील विषय ठेवले व सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली बँकेचे तज्ञ संचालक आनंद जेठानी यांनी अहवाल वाचन केले सभेमध्ये तलवारबाजीत गोल्ड व कांस्यपदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीत उत्तीर्ण सभासदांच्या पाल्यांना व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, संचालक मंडळ व मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. सुजित दिवटे यांनी सूत्रसंचालन केले तर जीवन सपकाळे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानले त्यानंतर पसायदानाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या