🌟पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात 34.74 टक्के पाणीसाठा....!


🌟अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली🌟

 परभणी (दि.19 ऑगस्ट 2024) :  पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात हळूहळू वाढ होत असून या जलाशयात सध्या 34.74 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

              या जलाशयात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत तर 809.770 दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. या जलाशयात 934.440 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्या तूलनेत सोमवारी (दि.19) सकाळी 8 वाजेपर्यंत या जलाशयात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत, 281.323 जिवंत  तर 405.293 मीटर एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. जलाशयातील पाणी पातळी 455.260 मीटर एवढी असून मागील 24 तासात या जलाशयात 3.437 दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. जलाशयात सध्या 34.74 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या