🌟सहकुटुंब सहभागी होऊन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन आर्य समाज प्रधान जी.व्ही.मारमपल्ले यांनी केले🌟
नांदेड (दि.30 ऑगस्ट 2024) : आर्य समाज नांदेडच्यावतीने या वर्षी श्रावणी वेदप्रचार मासाच्या निमित्ताने यज्ञ, प्रवचन, प्राणायाम प्रशिक्षण, महिला संमेलन व शंकानिवारण आदी कार्यक्रमांसह दोन दिवसीय चिंतन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वैदिक विद्वान पंडित राजवीरजी शास्त्री (सोलापूर) यांचे प्रवचन होणार असून त्यांच्यासोबत आर्य भजन प्रचारक पंडित जितेंद्रदेव आर्य (बरेली उत्तर प्रदेश) यांचे भजन होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसाच्या उत्सवात सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत आर्य समाज मंदिर, नवा पुल, नांदेड येथे सहकुटुंब सहभागी व्हावे आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग स्वीकारा, असे आवाहन आर्य समाज नांदेडच्या प्रधान जी.व्ही. मारमपल्ले यांनी केले आहे.......
0 टिप्पण्या