🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले गणेश मंडळांना आवाहन🌟
परभणी (दि.08 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्र शासनाने दि. 07 सप्टेंबर पासून सूरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि.31 जुलै, 2024 च्या शासन निर्णयातील बाबीची पुर्तता करणा-या/करु शकणा-या जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी या शासन निर्णयात जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि. 31 ऑगस्ट, 2024 पूर्वी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती असेल ही जिल्हास्तरीय समिती पर्यावरणपुरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, सामाजिक कार्य शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या विविध प्राथमिक सुविधा इत्यादीच्या गुणाच्या अधारे जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करेल. राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्यााहतून प्रत्येकी 1 या प्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या 3 विजेत्यांची निवड करतील त्यात प्रथम क्रमांकास रु.5 लक्ष, व्दितीय क्रमांकास 2.50 लक्ष व तृतीय क्रमांकास रु. 1 लक्ष पारितोषक व प्रमाणपत्र देउन गौरव करण्यात येईल. उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये 25 हजार चे पारितोषक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सदरचा पुरस्कार हा राज्यस्तरावरून देण्यात येत आहे......
0 टिप्पण्या