🌟जिंतूर तालुक्यातील दुधगावच्या ग्रामस्थांचे पिक विम्यासाठी जोरदार भजन-कीर्तन आंदोलन.....!


🌟दुधगाव महसुल मंडळात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे झाले होते अतोनात नुकसान🌟 

जिंतूर : तालुक्यातील दुधगाव महसुल मंडळातील शेतकर्‍यांना खरीप व रब्बी २०२३ चा हरभरा व तूर पिकास कापणी पश्‍चात पीक विमा द्यावा. तसेच सोयाबीन,कापूस इतर पिकांचा पिकविमाही द्यावा, यासाठी संतप्त ग्रामस्थांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ११.०० वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोरदार भजन-कीर्तन आंदोलन केले.

               दुधगाव महसुल मंडळात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात असे नुकसान झाले. कृषि व महसुल विभागाने पंचनामे केले. परंतु, काही शेतकर्‍यांना विमा मिळाला तर काहींना मिळाला नाही. त्यामुळे या भागात संबंधित आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीविरुध्द मोठा रोष निर्माण झाला आहे. कंपनीसह जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन दिली. कृषिमंत्र्यांनासुध्दा पत्र दिले. परंतु, कोणीही दखल घेतली नाही, अशी खंत इर्शाद पाशा चाँद पाशा यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या