🌟महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 : शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे🌟

परभणी (दि.16 ऑगस्ट 2024) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत शासन निर्णयान्वये नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या आनुषंगाने अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. 13 ऑगस्ट 2024 च्या पत्रान्वये पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतक-यांसाठी महा-आयटी यांनी दि. 12 ऑगस्ट, 2024 ते 07 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदर कालावधीत संबंधीत शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा लघू संदेश शेतक-यांना महा-आयटी मार्फत शेतक-यांना देण्यात आला आहे. याबाबत संबंधीत बँकांनीदेखील शेतक-यांना व्यक्तीशः कळविणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या