🌟यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा मा.नगरसेवक मोहम्मद हाजी कुरेशी साहब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले🌟
पुर्णा :- पुर्णा शहरात आज रविवार दि.२५ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे आज प्रथमतः सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास माजी उपनगराध्यक्ष तथा मा.नगरसेवक मोहम्मद हाजी कुरेशी साहब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यानंतर बारा वाजता जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम हे होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागेश एगडे,उत्तम गायकवाड,राजु नारायनकर,विनोद गायकवाड,सुधाकर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बुरुड यांनी केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक दुपारी ०२.०० वाजता काढण्यात आली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयंती मंडळाचे अध्यक्ष किशोर मधुकर गायकवाड... उपाध्यक्ष युवराज मारोती गायकवाड कोषाध्यक्ष प्रदुम गायकवाड सचिव आकाश गायकवाड सचिन गायकवाड मनोज बालाजी उबाळे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.......
0 टिप्पण्या