🌟हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ : नागरिक त्रस्त....!
🌟मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी🌟

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातल्या शिवनेरी कॉलनी, निमराकॉलनी,आग्रवाल कॉलनी,खंदारबन रोड,साखर कारखाना रोड,झेडा चौक,मामा चौक दरगाह मोहल्ला,सत्यनारायण टॉकीज,जुने/नवीन बस स्थानक परिसर,मोढा परिसर,कौढा रोड आदी भागांमध्ये मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट झाला असुन या मोकाट कुत्र्यांची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

 या परिसरामध्ये दहा ते पंधरा कुत्रे एकत्र फिरत असुन आक्रमक पवित्रा घेत अबाल वृध्द,महीला,लहान बालके शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनीं या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीत वावरतांना दिसत आहेत . काही दिवसा पूर्वीच या कुत्र्यांच्या झुंडीने शेळीवर हल्ला करूण तिची शिकार केली होती पाळीव जनावरांप्रमाणेच ही मोकाट कुत्र्यांची कळप माणसांच्या अंगावर धाऊण जाऊन धडधाकड माणसांचा थरकाप उडवत घाम फोडीत आहेत सदरील मोकाट  कुत्र्याच्या कळपांचा वसमत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करुन ही मोकाट कुत्र्यांची कळप या परिसरातुन हाकलून लावावी अशा प्रकारचे विनंतीपत्र नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे......

✍🏻मोईन कादरी (हिंगोली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या